Marathi Duniya

Marathi Duniya
 
HomeCalendarFAQSearchMemberlistUsergroupsRegisterLog in

Share | 
 

 वासुदेव बळवंत फडके

Go down 
AuthorMessage
Admin
Admin


Posts : 31
Join date : 2010-04-12

PostSubject: वासुदेव बळवंत फडके   Fri Apr 16, 2010 11:32 pm

वासुदेव बळवंत फडके (१८४५-११-०४ -- १८८३-०२-१७) हे एक भारतीय क्रंतीकारक होते. त्यांना भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील सशस्त्रक्रांतीचे जन्मदाते म्हणून ओळखले जाते. त्यांनी रामोशांना एकत्र करून सशस्त्र क्रांतीकारकांच्या "रामोशी" या संघटनेची स्थापन केली आणि ब्रिटिशांचे राज्य उलथवून टाकणे हे या संघटनेचे महत्वाचे उद्दीष्ट होते. वासुदेव बळवंत फडके यांनी आपल्या एका अचानक घातलेल्या छाप्यात ब्रिटिश सैनीकांना ओलीस ठेवले व पुणे शहरावर ताबा मीळवण्यात यश मीळवले तेव्हां ते प्रकाशझोतात आले.

सुरुवातीचे जिवन
वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म ०४ नोव्हेंबर १८४५ साली महाराष्ट्रातील शिरढोण तालुक्यात झाला. त्यांनी शाळेतून बाहेर पडल्यानंतर अनेक वेगवेगळी कामे केली. या काळात त्यांनी गोविंद रानडे यांच्या वर्गांना हजेरी लावण सुरु केल. गोविंद रानडे यांच्या भाषणाचा रोख नेहमी ब्रिटीशांनी भारताचे आर्थिक शोषण कसे केले या कडे असायचा. फडकेंना भारतीय समाजीची ब्रिटीशांमुळॆ झालेली दैन्यावास्था पाहून फार दु:ख झाले. १८७० साली ते पूण्यात ब्रिटीश सत्तेवीरुद्धच्या जनाअंदोलनात सामील झाले. फडकेंनी त्यानंतर तरुणांना शिक्षण देण्यासाठी ऐक्यवर्धिनी सभा स्थापन केली.

रामोशांच्या मदतीने संघर्ष:
१८७५ साली बडोद्याचे राज्यकर्ते गायकवाड यांना ब्रिटीश सरकारने पदच्युत केल्यानंतर फडक्यांनी सरकार विरुद्ध भाषणे द्यायला सुरुवात केली. ब्रिटीश सरकारच्या धोरणामुळे भारतात दुष्काळी परिस्थीती निर्माण झाली होती, त्यासाठी लोकांचे मन वळवून त्यांना आंदोलना कडे परावृत्त करण्यासठी त्यांनी द्ख्खन भागाचा प्रवास केला. त्यांना सुशिक्षीत समाजाकडुन काहीही मदत न मीळाल्याने त्यांनी रामोशी समाजातील लोकांना हाताशी धरून आपली टोळी बनवली. कोळी, भील्ल आणि धनगर यांनाही पूधे सामील करून घेण्यात आले. त्यांनी स्वता: गोळी झाडणे, रपेट याचे शिक्षण घेतले. त्यांनी जवळपास ३०० बंडखोरांची टोळी बनवली, जीचे प्रमुख उद्दीष्ट हे ब्रिटीश सत्ता उलथवून टाकणे हे होते. त्यांना स्व:तचे सैन्य उभारायचे होते पण त्यासाठी लागणारे भांडवल त्यांच्याकडे नव्हते. हे भांडवल सरकारी तीजोरीतूनच घेण्याचे त्यांनी ठरवीले. त्यासाठी त्यांनी पहीला दरोडा पूणे जील्ह्यातील शिरुर तालुक्यातील धमरी गावी टाकला. ब्रिटिशांनी गोळा केलेला कर स्थानीक व्यापारी श्री बालचंद फौजमल संकला यांच्या घरात ठेवण्यात आले होते. त्यांनी त्या घरावर हल्ला करून लुटलेला पैसा दुष्काळ ग्रस्त गावांच्या मदतीसाठी वापरला. तीथे त्यांनी ४०० रुपये गोळा केले पण त्यामुळे ब्रिटीश सरकारने त्यांना दरोडेखोर म्हणून घोषित केले. स्व:तला वाचवण्यासाठी त्यांना गावोगावी फिरावे लागले. त्यांच्या बद्दल सहानुभूती असणारयांनी त्यांना वेळोवेळी आसरा दीला; त्यात बहुसंख्य कनिष्ठ वर्गातील लोकांचा समावेश होता. त्यांची देशकार्यातील कळवळ आणि नीर्धारी स्वभाव यामुळे प्रभावीत झालेल्या नानगावच्या गावकरयांनी त्यांना जवळील जंगलात आष्रय दीला. सामान्यत: ब्रिटीश सरकारची संवाद यंत्रणा बंद करुन मगच दरोडा टाकणे ही पद्दत ते वापरत असत. या छाप्याचा मुख्य उद्देश हा दुष्काळग्रस्त गावकरयांना मदत करणे हा असायचा. त्यांनी शिरुर जवळ आणि खेड तालुक्याच्या आसपास अनेक छापे घातले.

काही दिवसांनी त्यांनी छापे वाढविले तसेच आपल्या विचारांनी अनेकांना प्रेरित करून आपल्या कार्यात सामील करुन घेतले. संघटनेची स्थीती बरयापैकी सुधारली. पण नंतर फडकेंच्या लक्षात आले की संघटनेतील लोकांना देश कार्यापेक्षा त्यांनी मीळवलेल्या लुटीत अधिक आनंद होता. त्यामुळे त्यानी दुसरी जागा शोधण्याचा नीर्णय घेतला. त्यांनी मलिलीकार्जुनच्या दिशेने कूच केले. एका नैतीक पराभवानंतर त्यांनी पुन्हा ५०० जणांचे सैन्य जमवले. या वेळेस त्यांनी सैन्यबांधणी सठी रोहिलांना एकत्र केले, मजबूत सैन्य बांधणी केली.

अटक आणि मृत्यु:
वासुदेव बळवंत फडके यांनी एकाच वेळी ब्रिटिशांवर अनेक हल्ले करण्याची योजना जास्त प्रमाणात यशस्वी होऊ शकली नाही. त्यांची एकदा घाणूर गावात ब्रिटिश सैन्याशी समोरा समोर टक्कर झाली. त्यावर सरकारने त्यांना पकडण्यासाठीचे बक्षीस जाहीर केले. त्यांउळे भयभीत न होता फडके यांनी उलट मुंबईच्या गव्हर्नरला पकडून आणण्यासाठी बक्षीस जाहीर केले, तसेच प्रत्येक इंग्रजाची हत्या करणारयासही ईनाम जाहीर केले. त्याच बरोबर सरकारवर ईतर मार्गांनी दबाव आणण्यास सुरूवात केली. नंतर ते आपल्या संस्थेत आणखी रोहीला आणि अरबांना सामील करून घेण्यासाठी हैद्राबाद शहरात दाखल झाले. ब्रिटीश मेजर हेन्री विल्यम्स डॉनीयल, अब्दुल हॉक आणि हैद्राबादेतील निजाम पोलिस कमीशनर दीवस रात्र फडकेंच्या मागे लागले. ब्रिटीशांनी त्यांना पकडण्यासाठी जाहीर केलेले ईनाम लागू पडले; कोणितरी त्यांच्याशी गद्दारी केली. आणि हैद्राबादेतील देवार, नवडगी इथे झालेल्या खडाजंगीत ते पकडले गेले. त्यांना नंतर खटल्यासाठी पुणे ईथे नेण्यात आले. त्यांनीच लीहिलेल्या रोजनीशीमूळे ब्रिटीशांना पूरावा मीळाला व फडकेंना जन्मठेपेची शीक्षा झाली, त्यासाठी त्यांना अंदेन येथे दाखल करण्यात आले. तेथून त्यांनी१३ फेब्रुवारी १८८३ रोजी तुरुंगाचा दरवाजा उअखडून पलायन केले. पण ते फारच थोड्या दीवसात पून्हा पकडले गेले. त्यांनी नंतर आमरण उपोषण सुरु केले ज्याचे पर्यावसान त्यांच्या मृत्यू मधे झाले. १७ फेब्रुवारी १८८३ रोजी त्यानी शेवटचा श्वास घेतला.

* वासुदेव बळवंत फडके
Back to top Go down
View user profile http://marathiduniya.board-directory.net
 
वासुदेव बळवंत फडके
Back to top 
Page 1 of 1

Permissions in this forum:You cannot reply to topics in this forum
Marathi Duniya :: मराठी विभाग :: थोर व्यक्‍ती आणि त्यांची माहिती-
Jump to: